दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रात भव्य गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. कंपनीच्या संचालिका पूनम गोखले व वित्तीय सल्लागार अतुल गलांडे या वेळी उपस्थित होते. सदर गृहमहोत्सवाचे हे सलग सातवे वर्ष आहे.
या विषयी माहिती देताना विशाल गोखले म्हणाले, “नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये ९ नवे गृहप्रकल्प सादर करणे व पूर्ण झालेल्या ९ गृहप्रकल्पांचे हस्तांतरण करणे ही गोखले कन्स्ट्रक्शन्सची परंपरा आम्ही याही वर्षी कायम राखत आहोत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”
यंदा आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, मुकुंद नगर, सहकार नगर, सुभाष नगर आणि औंध अशा शहरातील ९ मध्यवर्ती लोकेशन्सला साकारत असलेल्या आमच्या विविध गृहप्रकल्पांमधून ग्राहकांना आपल्या स्वप्नातील घर निवडता येणार आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या काळात सदनिका बुक केल्यास रु. ९९९९ प्रती चौरस फूट इतक्या विशेष सवलतीच्या दराचा लाभ ग्राहकांना घेता येणार असल्याची माहिती गोखले यांनी दिली.
वर नमूद केलेल्या गृहप्रकल्पांमध्ये २, ३, ४ आणि ४.५ बीएचके प्रकारच्या सदनिका उपलब्ध असतील ज्याची किंमत रुपये १ कोटी २५ लाखांपासून पुढे असेल.महोत्सवातील सर्व गृहप्रकल्प हे रेरा (RERA) नोंदणीकृत आहेत.
याबरोबरच सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात पूर्णत्वास आलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या ‘मिस्ट’ या गृहप्रकल्पात देखील न भूतो न भविष्याती अशा किंमतीत ‘रेडी पझेशन’ सदनिका खरेदी करणे शक्य होणार आहे. ग्राहकास प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध सवलतींचा अंतर्भाव करणे शक्य असल्यास १ बीएचकेसदनिका सुमारे १५.५० लाख रुपयापर्यंत तर २ बीएचके सदनिका ही २४.५० लाख रुपयांत खरेदी करता येतील.