भारतात राजेशाही लग्न करण्याची क्रेज सध्या चालू आहे. शाही लग्नात राजे महाराजांसारखे पोशाख परिधान केले जाते, ज्यामध्ये देशातील विविध राजांच्या पोशाखाचे अवलंब केले जातात. परंतु आज तागायत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारांजाचे पोशाख वापरण्यात आले नाही. त्यामुळे पुण्यातील मराठमोळ्या युवक दिपक माने हे शिवाजी महाराजांचा पोशाख शिवजातस्य नावाने शाही लग्नासाठी सादर करीत आहे, तेही महाराष्ट्रात नव्हे तर लंडनमध्ये. पुणेकर कुठल्याही क्षेत्रात मागे नसतात. आपली छाप देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात सोडत असतात मग ते फॅशन मध्ये कसे मागे राहतील. हेच उद्देश समोर ठेवून काही तरी वेगळे करण्याच्या मनसुब्याने व शिवाजी महाराजांच्या आचार आणि विचाराने प्रेरित होऊन शिवजातस्य या नावाने शाही पोशाखास आधुनिकतेची जोड देत सादर करित आहे.
शिवजातस्य या शिवाजी महारांच्या शाही पोशाखमध्ये आभूषण, वस्त्र, मुजडी, पगडी आदीचा समावेश आहे. लंडनमध्ये छत्रपति शिवाजी महाराजांची तलवार व सिंहासन आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पोशाखाच्या माध्यमातून पोहंचविण्याच्या पुण्यातील दिपक माने या तरुणाने शिवाजी महाराजांचा पोशाख तोही आजच्या फॅशनला अनुसरुन सादर करण्याचा ध्येय घेतला आहे.
लंडनमध्ये इंडिया फॅशनविक ऑलमपिया 11 नोव्हेंबला होत आहे. जिथे संपूर्ण भारतातुन अनेक डिजाइनर्स आपले कलेक्शन सादर करतील. या फॅशन शोमध्ये शिवाजी महाराजांचा पोशाख आजच्या फॅशनला ताळमेळ घालत तसेच त्यांनी परिधान केलेले दागिने ही यावेळी सादर करण्यात येणार आहे. या फॅशनविक साठी पुण्यातून 25 मॉडेल जाणार आहेत आणि महाराष्ट्राच्या संस्कृती सह शाही पोशाख सोबत आभूषण सादर करणार आहे. या द्वारे छत्रपती महाराजांचे पोशाख सादर करणारे दिपक माने हे देशातील प्रथम व्यक्ती मानले जात आहेत. शाही लग्नासाठी नवरा-नवरीसाठी शाही पोशाख सादर करणार आहे. छत्रपती शिवाजींचा पोशाख बनविण्यासाठी दिपक माने यांनी तब्बल 2 वर्ष संशोधन केले. यासाठी त्यांनी 20-25 किल्ले पिंजूण काढले. यासाठी त्यांच्या 34 जणांच्या टीमने मेहनत घेतली. दिपक माने हे राजा महाराजांचे कपड़े, आभूषण, फेटा, पगड़ी, बुट, चप्पल सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी काम करीत आहे. शाही लग्नासाठी सर्व काही एकाच छताखाली मिळावे या दृष्टीने त्यांनी तशी उपाययोजना केली आहे. येथे शाही पोशाख, आभूषण, डोली सर्वकाही याच ठिकाणी मिळणार आहे.
पुण्यातील दिपक माने म्हणतात, “मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे . महाराष्ट्रीयन असल्यानेच आपली संस्कृती व महाराजांचा इतिहास जगभर पोहंचविण्याच्या उद्देशानेच या प्रकारचा पोशाख बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा पोशाख आधुनिक युगाशी ताळमेळ जोडत आम्ही शिवजातस्य कलेक्शन सादर करीत आहे. याचा मला अभिमान आहे. आणि सर्वस्तरातून याचे स्वागत केले जाईल याची मला खात्री आहे.”