18.8 C
New York
Thursday, November 7, 2024

Buy now

spot_img

पुणे येथे 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीतआंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन

जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सहकार्याने 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत दुस-या आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन पुणे येथे करण्यात आल्याची माहिती जलसंपदा लाभ क्षेत्रविकास व जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.

             सिंचन भवन येथे आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदे संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  राष्ट्रीय जलविज्ञान प्रकाल्पाचे  वरिष्ट सह आयुक्त राकेश कश्यप, वरिष्ट सहआयुक्त दीपक कुमार, महासंचालक एन.व्ही. ‍शिंदे, विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता वि.जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते,  जलविज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द. भगत, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स.द. चोपडे, कुकडी पाटबंधारे मंडळाचे  अधीक्षक अभियंता ह. तु. धुमाळ, पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे  अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, अधीक्षक अभियंता श्रीमती सु. न. जगताप,  अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे आदी उपस्थित होते.

                        राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून पवार म्हणाले,  राष्ट्रीय जलविज्ञान  प्रकल्प राबविणा-या विविध राज्ये व संस्था यांचे मार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कार्यरत अभियंते, शास्त्रज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक, निर्णय प्रक्रियेतील अधिकारी यांना नियमितपणे एकत्र येण्याचे आणि भारतातील जलव्यवस्थापनाबाबत निर्माण होणा-या आव्हाने व संधीवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

                   सचिव पवार म्हणाले,  आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही दुसरी परिषद असून यापुर्वी चंदीगड येथे अशा स्वरूपाची परिषद झाली आहे. पुण्यात होणारी ही आतंरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी परिषद असून जलसंपदा विभागाच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जागतिक बँक तसेच सिंचन व निचरा  विषयक कमिशन कमिशनचे तज्ज्ञ  तसेच ऑस्ट्रेलिया, यु.एस. यु.के.नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरीया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ,  या देशांमधील आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञ  सहभागी होणार आहेत. सदर परिषदेमध्ये 12 तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये तज्ज्ञ आपले अनुभव सांगणार आहेत. जलसंधारणाच्या उत्कृष्ट  पध्दतीवर समर्पित एक पुर्ण सत्र आयोजित करण्यात आले आहे.जलयुक्त स्त्रोतांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्था आपले अनुभव कथन करण्यासाठी सहभागी होणार आहेत.

जलसंपदा विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन व कला तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या संशोधकांसाठी एक पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

       6 नोव्हेंबर 2019 रोजी हॉटेल हयात रीजेंसी येथे होणा-या परिषदेचे उदघाटन जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंन्द्रसिंग शेखावत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर 7 नोव्हेंबर रोजी परिषदेचा समारोप जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही सचिव पवार यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

22,002FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles