-10.4 C
New York
Monday, December 23, 2024

Buy now

spot_img

रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन पिंपळे सौदागर येथे दिमाखात सुरू

१४० वर्षाची परंपरा, सोबत सचोटी, शुध्दता, प्रामाणिकपणा, ग्राहकांशी विश्‍वासाचे नाते व उत्तम सेवा यामुळे पुणेकर जनतेच्या मनात व हृदयात आगळेवेगळे प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या ८५०० चौ. फुटाच्या ११ व्या सुवर्ण दालनाचे आज कोकणे चौक, पिंपळे सौदागर, रहाटणी येथे शानदार उद्घाटन झाले.
मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचित आहे. याचेच औचित्य साधून या ११ व्या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या महिला, मुलीं व माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार या सर्वांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रांका ज्वेलर्स हे सातत्याने ग्राहकांच्या फायदयासाठी विविध योजना राबवीत असते. या दालनाच्या उद्घाटना निमित्त ग्राहकांना मुबलक प्रमाणात खरेदी करता यावी यासाठी सोन्याच्या दागिन्यांची मजूरी २११ रुपये प्रति. ग्रॅम पासून पुढे व व्हिव्हिएस – एफ/जी हिर्‍यांचे दागिने ४५ हजार रुपये प्रति कॅरटपासून पुढे इंटरनॅशनल लॅब सर्टिफिकेटसहीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रांका ज्वेलर्सच्या व्यवसायाचा प्रारंभ रविवार पेठ येथील दालनाने सुरूवात होऊन थोडयाच कालावधीत लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, ठाणे (मुंबई) आणि आता कोकणे चौक, पिंपळे सौदागर अशी एकूण ११ दालने ग्राहकांच्या सेवेस सज्ज आहेत.

Related Articles

Stay Connected

22,002FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles