ठळक वैशिष्ट्ये –
कंपनीने २०२४ या वर्षात आपली घोडदौड चांगली राखली असून अनेक महत्त्वाची पावले या काळात उचलण्यात आलेली आहे. त्यामुळेच प्रगतीचा चढता आलेख दिसून येतो आहे.
· कंपनीच्या इपीडी प्रकल्पामध्ये NPCIL टीमच्या हस्ते २२० MW प्रायमरी कूलंट पंप मेकॅनिकल सीलच्या चाचणी केंद्राचे उद्घाटन कऱण्यात आले आहे.
· देशांतर्गत बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून रेसिप्रोकेटिंग प्लंजर टाईप पंप बाजारात सादर करण्यात आला आहे.
· NTPC तालचेर वीज प्रकल्पासाठी BHEL कडून तसेच अँड्रेस-१ वीज प्रकल्पासाठी TSK स्पेनकडून महत्त्वाच्या व्हॉल्व्ह ऑर्डर मिळाल्या आहेत.
· GHG एमिशन्स, झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) या सुविधांसाठी ESG- सर्टिफिकेशन आणि थर्ड पार्टी अश्युरन्स प्राप्त झालेले आहेत.
· सरकारी योजनांअंतर्गत MSEDCL आणि महाराष्ट्र ऊर्जा कडून ४०३ दशलक्ष रुपये मूल्याचे, तसेच दक्षिण गुजरात विज कंपनी कडून २०४ दशलक्ष रुपये मूल्याचे सोलरपंपांचेऑर्डर सुरक्षित केले.
केएसबी लिमिटेडने २०२४ मध्ये २५३३ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवले असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १२.७%वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीतील विक्री उत्पन्नात मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत २०.५%वाढ नोंदवली गेली, आणि तिमाही समाप्त करताना विक्री उत्पन्न ७२६.४कोटी रुपये होते.
कंपनीने २०० टक्क्यांचा लाभांश जाहीर केला असून कंपनीचे स्थान अधिकाकाधिक बळकट होत आहे. दरवर्षी सातत्याने प्रगती होत असल्याचे हे निदर्शक आहे.
केएसबी लिमिटेडचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत कुमार या व्यावसायिक प्रगतीविषयी भाष्य करताना म्हणाले, “या वर्षी आमच्या कंपनीने चांगली प्रगती केली असून विक्री महसूलात १२.७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. आम्ही सोलर, व्हॉल्व्स, बिल्डिंग सर्व्हिसेस, वेस्ट वॉटर, आणि डोमेस्टिक विभागांमध्ये चांगल्या प्रगतीचे लक्ष्य गाठलेले आहे. या वर्षी निवडणुकांसह इतर विविध कारणांमुळे व्यावसायिक प्रकल्पांचा वेग काहीसा मंदावलेला होता तरीहीआम्ही मरीन क्षेत्रात प्रगती केली आहे तसेच ग्रीन हायड्रोजन व रेल्वे विभागांकडून काहीमहत्वाच्याऑर्डर्स मिळवल्या आहेत.उत्तम व्यावसायिक वाटचालीवर आणि निर्यातीवर आमचा भर असून अर्थव्यवस्थेतील छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आम्ही आमच्यावर होऊ देणार नाही. आमच्या निर्यातीच्या व्यवसायामुळे आम्ही आमचे जागतिक स्तरावरील स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न करू.